Ad will apear here
Next
‘लेखापालन क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध’
सीए चंद्रशेखर चितळे यांचे मत


पुणे : ‘सनदी लेखापाल झाल्यानंतर नोकरी, स्वतंत्र व्यवसाय आणि इतर अनेक क्षेत्रांत काम करता येते. लेखापालन क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. कठोर मेहनत, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर ‘सीए’सारख्या आव्हानात्मक परीक्षेत यश संपादन करू शकतो,’ असे मत ज्येष्ठ सनदी लेखापाल आणि दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांनी व्यक्त केले.

‘आयसीएआय’ पुणे शाखा आणि वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशन (डब्ल्यूआयसीएएसए-विकासा) पुणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सीए करिअर काउंसलिंग’ या मोफत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. बीएमसीसी रस्त्यावरील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या काळे सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत ‘आयसीएआय’च्या पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए ऋता चितळे, उपाध्यक्ष सीए अभिषेक धामणे, सीए समीर लड्डा यांनी मार्गदर्शन केले. पालक, दहावी-बारावी उत्तीर्ण, परीक्षा दिलेल्या आणि सीए होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.



सीए ऋता चितळे म्हणाल्या, ‘कला, वाणिज्य, विज्ञान या कोणत्याही शाखेचा विद्यार्थी सनदी लेखापालची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो. सनदी लेखापालसाठीची परीक्षा अवघड असते हा विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनातील एक गैरसमज आहे. सीए वाणिज्य व्यापाराच्या सर्व मार्गांमध्ये सेवा देऊ शकते. त्यासाठी लागणार अभ्यासक्रम आणि संरचना, परीक्षांची माहिती आपण समजून घ्यावी.’

सीए संकेत शहा, सीए श्वेता पुजारी, सीए पुष्कराज बेडेकर, सीए रिद्धी चांडक, सीए शीतल धूत यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. ‘सीए’ बनण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गोष्टी, अभ्यासक्रम, या सर्व गोष्टी पॉवर-पॉइंट सादरीकरणाद्वारे दाखविल्या. ‘सीए’ करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ‘विकासा’कडून नियमित उपक्रम, सेमिनार, परिषदा, मूलभूत अभ्यासक्रम यांचीदेखील माहिती या मार्गदर्शन शिबिरात देण्यात आली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZYTBZ
Similar Posts
‘सीए फाउंडेशन डे’निमित्त २८ जूनला विविध कार्यक्रम पुणे : सनदी लेखापाल स्थापना दिवसानिमित्त (सीए फाउंडेशन डे) दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) आणि वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशन (विकासा) यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २८ जून २०१९ रोजी बिबवेवाडीतील ‘आयसीएआय’ भवन येथे गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम होणार आहे
‘सनदी लेखापालांमुळे ‘जीएसटी’ संकलनात मोठी वाढ’ पुणे : ‘वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठीच आणलेला आहे. त्यामध्ये सुधारणेला वाव असून, त्यासाठी जीएसटी कौन्सिल नियमित बैठक घेऊन ‘जीएसटी’ला ‘गुड अँड सिम्पल टॅक्स’ बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. ‘जीएसटी’मुळे कर संकलनात मोठी वाढ झाली आहे,’ असे प्रतिपादन ‘सीजीएसटी’च्या मुख्य आयुक्त कृष्णा मिश्रा यांनी केले
‘आयसीएआय’च्या ‘सीसीएम’पदी चंद्रशेखर चितळे पुणे : दि इन्स्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) कमिटीवर पुण्यातील सीए चंद्रशेखर चितळे यांची ‘सेंट्रल कौन्सिल मेंबर’ म्हणून, तर सीए आनंद जाखोटिया, सीए अरुण आनंदागिरी व सीए यशवंत कासार यांची ‘रिजनल कौन्सिल मेंबर’ म्हणून निवड झाली आहे. पुणे शाखेतून एक सीसीएम आणि तीन आरसीएम निवडून
‘सीए सामाजिक, आर्थिक विकासाचे प्रतिनिधी’ पुणे : ‘प्रामाणिक करदात्यांना न्याय मिळावा, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सामाजिक-धार्मिक संस्थानीही प्राप्तिकरातील तरतुदी समजून घेत वेळेवर लेखा परीक्षण करावे. त्यासाठी लेखापालांनी (सीए) पुढाकार घ्यावा. कारण तेच सामाजिक व आर्थिक विकासाचे प्रतिनिधी आहेत,’ असे प्रतिपादन दिल्ली येथील मुख्य

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language